santosh deshmukh murder case bjp mla suresh dhas slams dhananjay mudne in beed morcha

Date:

- Advertisement -


Suresh Dhas in Beed Morcha: बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी आज बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चामध्ये विविध पक्षाच्या आणि संघटनांच्या लोकांनी भाषण करत असताना राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे आणि संशयित आरोपींवर जोरदार टीका केली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी भाजपाचे आमदार सुरेश धस हे पहिल्या दिवसांपासून आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते. आजही त्यांनी आपल्या भाषणातून धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीची करुण कहानी सांगत असताना करुणा धनंजय मुंडे यांचा उल्लेख केला. कालच त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे वाद उद्भवला होता.

हे वाचा >> Prajakta Mali: प्राजक्ता माळीचं नाव का घेतलं? सुरेश धस यांनी केलं स्पष्ट; तक्रारीच्या मुद्द्यावर म्हणाले…

urmila kothare car accident video

अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना चिरडलं, एकाचा मृत्यू; घटनास्थळावरील व्हिडीओ आला समोर

Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?

Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…

suresh dhas prajakta mali on santosh deshmukh murder

Prajakta Mali: प्राजक्ता माळीचं नाव का घेतलं? सुरेश धस यांनी मांडली भूमिका; तक्रारीच्या मुद्द्यावर म्हणाले…

Beed News

Santosh Deshmukh Murder Case : “…तर मी वंजारी नाही”, बीडमधील जातीपातीच्या राजकारणावर जितेंद्र आव्हाडांचं मोठं वक्तव्य

Prakas Solanke Santosh On Dhananjay Munde

Prakas Solanke : “…तोपर्यंत धनंजय मुंडेंचं मंत्रिपद काढून घ्या”, राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराची फडणवीस अन् अजित पवारांकडे मोठी मागणी

Chhatrapati Sambhajiraje On Dhananjay Munde

Chhatrapati Sambhajiraje : “धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्री केलं तर मी स्वत:…”, छत्रपती संभाजीराजेंनी कडक शब्दांत ठणकावलं

Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee

Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली नाही’, डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतीस्थळाच्या मागणीवर प्रणव मुखर्जींच्या लेकीचा संताप

Sandeep Kshirsagar on Viral Photo

Sandeep Kshirsagar: तरुणीबरोबरच्या त्या व्हायरल फोटोवर आमदार संदीप क्षीरसागर यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “तो फोटो…”

करुणाचे खूप हाल झाले

धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड हेदेखील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी असल्याचे विधान मोर्चामधील अनेक नेत्यांनी केले. सुरेश धस यांनी वाल्मिक कराड यांची जिल्ह्यात दहशत असून खंडणी उकळण्याचे आणि ती त्यांच्या आकापर्यंत पोहोचवण्याचे काम केले जात असल्याचा आरोप केला. यावेळी ते म्हणाले, “ही आमच्या बीड जिल्ह्याची करुण कहाणी आहे. मी करुणा कहाणी नाही म्हणत नाही. तिची तर कहाणी वेगळीच आहे. मी फक्त करुण कहाणी म्हणतोय. करुणा तर माझी माय माऊली पहिली बायको आहे. तिचे खूप हाल चालले आहेत. मला याबाबत अधिकचे काही बोलायचे नाही.”

हे वाचा >> Bajrang Sonwane : “संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर…”, बजरंग सोनवणे यांचा मोठा इशारा

धनंजय मुंडेंचे मंत्रीपद काढून घ्या

सर्वपक्षीय मोर्चात धनंजय मुंडे यांच्याच पक्षाचे आमदार प्रकाश सोळंकेही सामील झाले होते. संतोष देशमुख प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत आणि आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत मुंडेंचे मंत्रिपद काढून घ्यावे, अशी मागणी प्रकाश सोळंके यांनी केली. गेल्या पाच वर्षांत धनंजय मुंडे हेच पालकमंत्री होते. तेव्हा पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं की धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री पद भाड्याने दिले. ते वाल्मिक कराड यांनाच भाड्याने दिले होते. त्यांनी या माध्यमातून बीड जिल्ह्यात जरब बसविली, असाही आरोप प्रकाश सोळंके यांनी केला.

Story img Loader





Source link

- Advertisement -

Top Selling Gadgets

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twelve + six =

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Jemimah Rodrigues Takes Stunning Catch As Delhi Capitals Dominate Mumbai Indians

Rodrigues’ brilliant effort in the field further cemented...

Ultra-Thin ‘iPhone 17 Air’ Rumored to Include These 12 Features

While the so-called "iPhone 17 Air" is not...

Access Denied

Access Denied You don't have permission to access...

Top Selling Gadgets