‘…म्हणून वेळीच खबरदारी घ्या’, शरद पवारांचा CM फडणवीसांना सल्ला! पत्रात सुरेश धसांचाही उल्लेख

Date:

- Advertisement -


Sharad Pawar Letter To CM Fadnavis: बीडमधील केज तालुक्याती मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून मागील काही दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये आक्रोश मोर्चांचं आयोजन केलं जात आहे. आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. असं असतानाच आता राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये शरद पवारांनी एक मोठी मागणी केली आहे. ते नेमकं काय म्हणालेत पाहूयात…

क्रूर घटनेला भला मोठा काळ उलटून गेला असला तरी…

शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा फोटो सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. “बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची महिनाभरापूर्वी काही गुंडांनी निर्घृण हत्या केली. या क्रूर घटनेला भला मोठा काळ उलटून गेला असला तरी देशमुख यांचे मारेकरी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना आहे. त्यामुळे, या संपूर्ण घटनेला फार मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे निदर्शनास येते,” असं शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा फोटो शेअर करताना एक्सवर (ट्वीटरवर) म्हटलं आहे. 

गुंडांपासून या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका

“बीड- परळी भागात यापूर्वी देखील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे या गुंड प्रवृत्तीची पाळेमूळे खणून काढण्याची राज्यभरातील अनेक लोकप्रतिनिधींकडून मागणी होत आहे व त्यासाठी ते सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करत आहेत. असे असताना याच गुंडांपासून या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर लोकप्रतिनिधींच्या व इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत त्यांना राज्य शासनामार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे,” असं शरद पवारांनी हे पत्र शेअर करताना म्हटलं आहे.

शरद पवारांचे पत्र जसेच्या तसे…

मागील महिन्यात बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच श्री. संतोष देशमुख यांचे काही गुंडांनी अपहऱण करुन निर्घृण हत्या केली. सदर अमानवीय घटनेचे पडसाद केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात उमटले. गुन्ह्यातील फरार आरोपींना आणि त्यामागील सुत्रधारांना तात्काळ अटक करावी म्हणून महाराष्ट्राभरात आंदोलने उभी राहिली आहेत. यासंदर्भात बीड जिल्ह्यात निघालेला पहिला आक्रोश मोर्चा राज्यशासनापर्यंत या घटनेचे गांभीर्य पोहोचवणारा होता. त्यात जात, धर्म आणि पक्ष हे भेद बाजूला सारुन क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या घटनेचा निषेध झाला. फरार आऱोपींना व त्यामागील सुत्रधारांना तात्काळ अटक होऊन कडक शासन व्हावे अशी एकमुखाने मागणी करण्यात आली. सदर आक्रोश मोर्चाच्या सांगता प्रसंगी आमदार सर्वश्री संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, जितेंद्र आव्हाड, अभिमन्य पवार आणि सुरेश धस तसेच बीडचे खासदार बजरंग सोणावने यांनी आपल्या भाषणांतून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. घटनेत सहभागी अशणारे गुंड, घटनेचे सुत्रधार व घटनेस जबाबदार असणाऱ्या व्यक्तीचा नामोल्लेख केला. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला लांछन लावणाऱ्या या घटनेचा तातडीने तपास व्हावा याकरीता प्रासरमाध्यमे देखील महत्त्वाची भूमिका बजावीत आहेत.

संतोष देशमुख यांची माणुसकीला काळीमा फासणारी घटना केवळ एकच नसून यापूर्वी हत्या, अपहरण, खंडणी, खोटे गुन्हे दाखल होणे अशा अनेक घटना बीड-परळी भागात घडल्या असल्याने त्या घटनांची पाळेमूळे खणून काढावीत अशी देशील मागणी केली. अनेक घटनांचा परस्परसंबंध असल्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली. एकूणच अनेक प्रकरणांची मालिका तपासात समोर येण्याची शक्यता असल्याने उपरोल्लेखीत लोकप्रतिनिधी तसेच सदर मंचावरुन जनतेला संभोधित करणाऱ्या इतर सन्माननीय व्यक्ती यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आपणास विनंती की, सदर घटनेविरुद्ध आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधी व इतर नेत्यांच्या जिवितास आणि आरोग्यास कोणताही धोका उत्पन्न होऊ नये म्हणून वेळीच खबरदारी घ्यावी. तसेच त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन योग्य ते पोलिस संरक्षण राज्यशासनामार्फत पुरवण्यात यावे.





Source link

- Advertisement -

Top Selling Gadgets

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × 1 =

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Asus ROG Phone 9 FE With Snapdragon 8 Gen 3 SoC Launched: Price, Specifications

Asus ROG Phone 9 FE has been launched...

Swiggy share price falls over 4% ahead of Q3 results today; Should you buy or sell?

Swiggy share price declined over 4% on Wednesday...

Top Selling Gadgets