Santosh Deshmukh: गेल्या काही वर्षांत बीडमध्ये अनेकांच्या हत्या झाल्या. त्यावेळी कारवाई झाली नाही. म्हणून यांची हिंमत वाढली आणि त्यांनी संतोषची हत्या केली, अशा शब्दांत आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर भाष्य केलं.

‘धनुभाऊ तुम्ही १ लाख ४० हजार मतांनी निवडून आलात. ३३० पैकी २३० बूथ ताब्यात असल्यावर निवडून येणारच. बोगस मतदानाच्या जीवावर तुम्ही विजयी झालात,’ असं म्हणत भाजप आमदार धस यांनी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना लक्ष्य केलं. ‘धनुभाऊ, वाल्मिक कराड आणि त्यांचे बगलबच्चे पिस्तुलं दाखवतात. बंदुकांच्या जीवावर दहशत माजवतात. तो फड गाडीची पूजा केल्यावर पिस्तुल काढतोय. जिल्ह्यात १२०० पेक्षा जास्त शस्त्र परवाने दिले आहेत. या प्रकरणात माजी पोलीस अधीक्षकांची चौकशी झाली पाहिजे,’ अशी मागणी धस यांनी केली.बीडमधील आक्रोश मोर्चाला लोकांची मोठी गर्दी, राज्यातील अनेक नेते मोर्चात दाखल
भाजप आमदार धस यांनी त्यांच्याच पक्षाच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनाही लक्ष्य केलं. ‘माझा पंकूताईला सवाल आहे. १२ तारखेला त्या छत्रपती संभाजीनगर एअरपोर्टला उतरल्या. त्या दिवशी गोपीनाथ मुंडे साहेबांची जयंती होती. त्या व्यग्र असतील मी समजू शकतो. पण त्यानंतर तुम्ही संतोष देशमुखच्या घरी का गेला नाहीत? तुम्ही फक्त कोरडं बोलतात. गोपीनाथ मुंडे साहेबांनी बीडमध्ये मटक्याचा खटका बसवला. उपमुख्यमंत्री असताना मुंबईतलं गँगवॉर मोडून काढलं. त्यांच्या सोबत १० वर्षे काम केलं. तो माणूस वेगळा होता. पंकूताई, तुम्हाला चांगली माणसं जमत नाहीत. तुम्हाला जी हुजूर करणारे लागतात. आम्ही स्वाभिमानी आहोत. आम्हाला हुजरेगिरी जमत नाही. पंकुताई, तुम्ही संतोष देशमुखच्या घरी का गेला नाहीत, त्याचं उत्तर द्या. तुमच्याकडून अपेक्षा होती, असं धस म्हणाले.अंजली दमानिया यांचे मोठे विधान, म्हणाल्या, धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी भाग पाडू…
‘निसार पट्टेदार मुस्लिम होता. गोपीनाथ मुंडे साहेबांचा समर्थक कट्टर समर्थक होता. एका निवडणुकीत तो विजयी झाला. मग त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. बीडमध्ये असे अनेकांचे खून झाले. संगीत दिघोळे, वसंत गित्ते, किशोर फड, काका गर्जे, पांडुरंग गायकवाड, बंडू मुंडे, बापू आंधळे.. इतके मर्डर झालेत. यांची बेरीज करा. माझ्याकडे असलेलं ७५ टक्के पान भरलंय. धक्कादायक बाब म्हणजे खून करणारे पण यांच्याच घरी पाणी भरतात आणि ज्यांच्या घरचा माणूस मेलाय, ते पण यांच्याच घरी पाणी भरतात. हा नवीन परळी पॅटर्न आहे. त्याची व्याप्ती वाढत गेली आणि हे देशमुखांपर्यंत पोहोचले,’ अशा शब्दांत धस यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीवर भाष्य केलं.